तुला शोधताना
तुला शोधताना
तुला शोधताना
हरवल्या दिशा दाही
विरले जरी कष्ट तरीही
हार मानलेली नाही
सुन्या अश्या जगात माझ्या
तुलाच फक्त स्मरतो आहे
तुझ्याच वाटेला डोळा लावून
विरहाची गाणी गातो आहे
गहिवरल्या प्रत्येक क्षणांसाठी
तुझ्या प्रेमाची सोबत असावी
मावळत्या त्या सूर्याला जणू
क्षितिजाची संग साथ असावी
मुकलो जरी प्राणास तरीही
लक्ष्य माझे हुकणार नाही
मिटले माझे डोळे तरीही
चेहरा तुझा विरणार नाही
तू येशील पुन्हा मजपाशी
आजही वाट पाहतो आहे
शोधूनी आता थकलोय तुला
मनी आस लावूनी जगतो आहे

