STORYMIRROR

Poonam Tavkar(Patil)

Romance

4  

Poonam Tavkar(Patil)

Romance

निःशब्द प्रेम

निःशब्द प्रेम

1 min
790


शब्दांनीच केली सुरुवात

भावनांनी मांडले विचार

विचारांच्या भोवऱ्यात गुंतले प्रेम माझे

नजरेत तुझ्या हरवले अस्तित्व माझे

नुसतंच ते नजरेतून झुरणं

शब्दांचं मात्र कागदावरच रेंगाळणं

सुन्या मैफिलीत उठलं होतं वादळ आयुष्याचं

तुझ्या येण्यानं उमगलं मोल माझ्या जगण्याचं


तुझ्याच प्रेमखुणांवर वाट मला सापडली

जगण्याची ही नवी दिशा मज गवसली

प्रेमाला या ना माझ्या रंग ना रूप

कसे बोलावे नि काय सांगावे

काहीच कळेना मनाची ही वेगळीच दशा

तुझ्याच प्रीतीची मी राधा बावरी

ओढ लागे मला तुझ्या भेटीची


तूच सारथी आता माझ्या आयुष्याचा

सांजवेळी दरवळे मनी गंध प्रीतीचा

मिठीत तुझ्या मन माझे मोहरले

स्पर्शात तुझ्या स्वप्न बावरे रंगले

शब्दांच्या पलीकडले हे भावनांचे जग

भावनांच्या जगात विरले निःशब्द प्रेमाचे बोल..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance