STORYMIRROR

Poonam Tavkar(Patil)

Romance

3  

Poonam Tavkar(Patil)

Romance

आठवणींचा खेळ

आठवणींचा खेळ

1 min
876


कधीतरी उगाचच तुझी आठवण येते

अन् मग नभात ढग दाटून येतात

बेभान पावसाच्या सरी बरसतात

मजुंळ वाऱ्याची झुळूक वाहाते

ओठी मंजुळ गाणी गुणगुणू लागतात

समुद्राच्या लाटा हळुवार उसळतात

आसमांत सप्तरंगी छटा उमटतात

तुझ्या आठवणींत सारेच रमतात..


मग एका सुंदर क्षणात तुझ येणं होत

अन् मन भिरभिरू लागतं

अलगद स्वप्नांना पालवी फुटू लागते

धुव्वादार पाऊस अन् सुसाट वारा

उधाण तांडव नृत्य करणाऱ्या लाटा

क्षितीजाला गवसणी घालणारं पाणी

अन् पावसांत चिंब भिजलेली गाणी

सगळेच तुझी परतीची वाट अडवतात

तुझ्या येण्यानं सगळेच जणू सुखावतात..


आठवणींचा हा खेळ

मी मनभरून खेळते

आपलं हे नाते

मी जिवापाड जपते…


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance