STORYMIRROR

Poonam Tavkar(Patil)

Inspirational

4  

Poonam Tavkar(Patil)

Inspirational

कधीतरी...

कधीतरी...

1 min
27.5K


कधीतरी तू दिसायचीस

मैत्रीच्या वळणावर क्षणभर थांबताना

का कुणास ठाऊक नजरेतूनच

माझ्या हृदयाशी साद घालताना


कधीतरी तू यायचीस

माझ्या मनीचे फुलपाखरू होऊन

झिलमिल चांदण्यांना

मखमली सुखाचा स्पर्श करून


कधीतरी वाटे तुझीच सावली बनून

अलगद तुला बिलगावे

भावनांच्या सुन्या मैफिलीत

सूर नवे प्रीतीचे छेडावे


कधीतरी मीही यायचो

स्वप्नातल्या गावी तुला भेटायला

अबोल शब्दांच्या खेळात

सर्वस्वी तुला जिंकायला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational