STORYMIRROR

Poonam Tavkar(Patil)

Romance

2  

Poonam Tavkar(Patil)

Romance

स्वप्नातली ती

स्वप्नातली ती

1 min
14.3K


स्वप्नातल्या तिची येण्याची वेळ झाली

की हमखास पाऊस बरसतो.


रिमझिम पाऊस आणि उधाण वारा

सगळं काही तिच्या आवडीचं.


पावसात तल्लिन होऊन अवतरलेली ती,

चिंब ओले केस, चेहऱ्यावर ओघळणारे थेंब,

गालावर खुललेलं गोड हसू

आणि पावसात बेधुंद भासणारी ती.


तिचा मंजुळ आवाज ह्रदयी गुलमोहर फुलवतो

आणि मग तीच्या नजरेत मी भान हरपून जातो.


तिचा अलगद होणारा हळूवार स्पर्श मनात रोमांच खुलवतो.

प्रेमाच्या वर्षावात माझ्या कवेत बिलगलेली ती

आणि मी रात्रीच्या चांदण्यात पार विरून जातो.


ती म्हणजे खरंच एक सुंदर स्वप्न जिथे मी रोज रमतो.

ती म्हणजे एक ओली आठवण जिथे तिच्याच सहवासात मी चिंब भिजून जातो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance