STORYMIRROR

Sanjay Jadhav

Romance

3  

Sanjay Jadhav

Romance

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी

1 min
248

मी मारतोय गप्पा 

करतोय थाट घातलाय घाट 

असंच काही वाटतंय चक्क 

तुझ्या साठी काय पण ....


मनाचा राजा आहे मजा 

करायचं काही ठरवलं नाही 

पोकळ गप्पा मारतोय बोंब 

तुझ्या साठी काय पण ...


राणी तू माझी मिजास भारी 

दिसायला बरी ,म्हणतात सारी 

बोलू लागलीस की भुलतात सारी 

तुझ्या साठी काय पण ...


गावरान गडी चालवतोय गाडी 

तालुक्याला जाऊनआणतो साडी 

माझ्या बापाची मजल्याची माडी 

तुझ्या साठी काय पण ..


रिकामा वेळ नाहीच मेळ 

सांच्याला लागते खायला भेळ 

संसाराचा झालंय सारा खेळ 

तुझ्या साठी काय पण ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance