तुला बघता क्षणी
तुला बघता क्षणी
तुला बघता क्षणी चाफ्याच्या फुलांनी
अलगद डोकावलं.
सुंदर त्या चाफ्याच्या फुलाच्या सुगंधाने
सारं रान सुगंधी होऊ लागलं.
तुला पाहात पाहात फुलाचं सांडणं होऊ लागलं.
बघता क्षणी तुझ्या ओंजळीत चाफ्याचं
फुल दरवळू लागलं.

