STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Romance

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance

प्रेम म्हणजे..?

प्रेम म्हणजे..?

1 min
199

तुझ्या सर्व सुखांत

माझ सुखं शोधणं

म्हणजे प्रेम...

तुझ्या सर्व दुःखांत

माझ्या आसवांचं गळणं

म्हणजे प्रेम.....

तू माझी असावी

ही वेडी आस

म्हणजे प्रेम...

तू दूर जाताना

होणारा त्रास

म्हणजे प्रेम....

प्रेम म्हणजे रातराणी दरवळणारी

प्रेम म्हणजे कोकीळेची मंजूळ वाणी..

प्रेम म्हणजे पहाटेचा गार वारा

आपल्याही नकळत

अंगावर फुललेला एक शहारा....

प्रेम म्हणजे जाणीव

दोघांतल्या विश्वासाची

प्रेम म्हणजे उणीव

एकमेकांच्या सहवासाची...

प्रेम असते जगावेगळे

लिंग, जाती, रीती

यांच्या सीमा ओलांडलेले...

प्रेम असते विहंगाप्रमाणे

शुभ्र निळ्या आकाशी

झेप घेऊ पाहणारे...

प्रेम म्हणजे तू

खळखळणाऱ्या झऱ्यापरी

प्रेम म्हणजे मी

तुज मिठी मारू पाहणाऱ्या खडकापरी...

प्रेम...

वाटलं तर सर्वकाही

नाही तर... काहीच नाही...!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance