STORYMIRROR

Sanjay Jadhav

Romance

3  

Sanjay Jadhav

Romance

प्रीत माझी

प्रीत माझी

1 min
240

उंच उंच झाडे 

उंच आकाशी जाती

आकाशाच्या ओढीने

फुलती बहरती


उंच उंच जाऊनिया

करती मैत्री विहंगा

उंच उंच खगा जारे

निरोप देरे जिवलगा


झाड म्हणे मन माझे

जडले आकाशाशी

कर वर्षाव प्रेमाचा

मागणे तुझ्यापाशी


अधीर झाले मन

ये रे हाकेला धावून

बरसरे तू लवकरी

थकले वाट पाहून


ओढ वाटे सदा तुझी

कधी वर्षाव होणार 

मोहरले मन माझे

उघडले मनाचे द्वार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance