STORYMIRROR

Prashant Kadam

Romance Inspirational

3  

Prashant Kadam

Romance Inspirational

पत्नी अन् आई

पत्नी अन् आई

1 min
229

मनातले तुझ्या मीच तर ओळखणार 

मनातच घुसमटणाऱ्या तुझ्या भावना 

कुटुंबा साठी सोसत असलेल्या यातना

सांग माझ्याविना कोणाला समजणार 


पत्नी अन् आई बनून तुझे सर्व परिश्रम 

माझ्यासह मुलांच्या सुखासाठीची धडपड 

संस्कार, स॔गोपनाचे ते काम अती अवघड 

लीलया करतेस देवून संपूर्ण वेळ अन् श्रम


दिवसरात्र करत असतेस आमचाच विचार 

अन् आम्हावर निस्सीम प्रेमाची उधळण

घेतेस नेहमी आनंद देण्यासाठी पुढाकार

रागावली तरी दिसतो त्याग आणि समर्पण


खरच प्रीत तुझी आहे अनाकलनीय फार

मात्र पत्नी अन् आई म्हणून आहेस तू थोर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance