STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Romance

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance

चिंब भिजून जातो !!

चिंब भिजून जातो !!

1 min
231

आज सहज तिला विचारले...

आठवते का ग तुला.. आपली पहिली भेट??

हळूच लाजत म्हणाली ती,

इश्य!! मी कशी विसरेन..?

असाच बरसत होता पाऊस

जेव्हा भेट आमची घडली;

अहो.. सोसाट्याच्या वाऱ्याने

होती तिची छत्री उडली..!!

सभ्यपणा दाखवत तिला

लगेच छत्री माझी दिली..,

माणुसकी दाखवत तिनेही मग

थोडी माझ्याशी शेअर केली..!!

पाहताच तिला मनात माझ्या

होती प्रेमाची घंटा वाजली

लग्नास होकार कळवत तिनेही

लगेच जन्माची गाठ बांधली..!!

अर्ध्यात सोडून गेली अचानक

मला एकटाच वाटेवरती,

त्याही दिवशी बरसला हा

जणू माझ्या आसवांचा सोबती..!!

फोटोतून मात्र रोजच बोलते

पन्नास वर्षे लोटली तरी,

पारिजातच दरवळतो जणू

तिच्या प्रत्येक आठवणींतूनी..!!

जेव्हा कधी पाऊस येतो

मन चिंब भिजवून जातो

पापणीच्या कोरा ओल्या होतात

मी ही चिंब भिजून जातो..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance