STORYMIRROR

Suuur 😊

Romance Inspirational

3  

Suuur 😊

Romance Inspirational

तू... कसा रे आहेस असा...

तू... कसा रे आहेस असा...

1 min
1.0K

तू... कसा रे आहेस असा...


"सगळ्यांवर फक्त प्रेमच करायचं" इतकंच माहिती असणारा 

जमलंच नसलं जरी, तरी कधी कधी थोडंसं रागवण्याचा प्रयत्न करणारा 


बाहेरून कितीही strong दाखवत असला, तरी मनाने हळवा असणारा 

मनात आठवणींचे काहूर माजल्यावर स्वतःच स्वतःला शांत करणारा 


तू... कसा रे आहेस असा... 


विचारांच्या डोहात बुडालेल्या मनाला, शांततेच्या होडीत बसवून अलगद बाहेर काढणारा 

नाकारात्मकतेला पळवून लावून नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणारा 


ह्या अनोळखी जगात स्वतःच असं ओळखीचं विश्व निर्माण करणारा 

कठीण वाटणाऱ्या गोष्टी अगदी सहजपणे जमवून आणणारा 


तू... कसा रे आहेस असा... 


परिस्थिती कोणतीही असो, नेहमीच इतरांच्या मदतीला धावून जाणारा 

"माझ्या शब्दांनी कोणाचं मन तर दुखावलं जाणार नाही ना?" याचा सतत विचार करणारा 


जरी एखादी गोष्ट हवीशी वाटली तरी त्याच्या प्रिय व्यक्तीसाठी ती गोष्ट नाकारणारा 

स्वतःच्या आनंदाआधी नेहमी इतरांच्या आनंदाचा विचार करणारा 


तू... जसाही आहेस तसाच खूsssssप छान आहेस...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance