तो : मनाचा एक हळवा कोपरा
तो : मनाचा एक हळवा कोपरा
तो मनाचा न कळलेला सूर
तो तिच्या आसवांचा पूर
तो एक हवीशी बेचैनी
तो नेहमीच तिच्या ध्यानीमनी
तो काळोख्या रात्रीची साद
तो शांत वाहणाऱ्या ओढ्याचा नाद
तो कातरवेळीचे क्षितिज धुंद
तो कधीही न सुटणारा मनाचा अनुबंध
तो क्षणाक्षणाला चालणारा श्वास
तो एक कधीही न संपणारा भास