सूर
सूर
सख्या, तुला दिलेले वचन मी अजूनही तोडत नाही
हृदयात कोरलेले अक्षर आता वाळूतही सापडत नाही
धाव घेते मन तुझ्याचकडे पण मी मनाला नेहमी सावरत राही
तुझ्या आठवणीत बसून मी अश्रूही आता गाळत नाही
हृदयातले तुझे अस्तित्व मी कोणालाही जाणवू देत नाही
वाऱ्यालाही शब्दांचे माझ्या अर्थ आता कळत नाही
फुलपाखराचा स्पर्श आता पाकळ्यांना आठवत नाही
फुलांचा उग्र दर्पही आता नाकाला झोंबत नाही
सूर माझ्या आयुष्याचे कानामध्ये गुंजतात काही
चेहऱ्यावर मात्र एक प्रसन्न हसू कायमच पहारा देत राही

