प्रेमाचं गणित
प्रेमाचं गणित
सुरु झाला होता एक
नवा अध्याय प्रेमाचा
पण त्याची खबरबात नव्हती
त्या दोघांच्याही मनाला
ते दोघेही त्यांच्या
नात्याला मैत्री समजत होते
पण त्यांचे नाते मात्र
मैत्रीच्याही पलीकडले होते
तिचं रुसून बसणं
त्याला अजिबात आवडायचं नाही
मग वेगवेगळे शब्दांचे मनोरे
रचून तो तिला हसवत जाई
त्याला तर तिच्यावर
खोटं खोटं हि रागावता येत नाही
तरी ती तिच्या मोडक्या तोडक्या शब्दरचनांनी
त्याचा न आलेला राग घालवण्याचा प्रयत्न करी
दिवस रात्र एकमेकांसोबत
बोलण्यास त्यांना वेळच नाही पुरत
काहीही झाले तरी रोजची कामं
मात्र दोघांनाही नाही चुकत
अशातच एके दिवशी
दोघांची भेटच झाली नाही
दोघांनाही कळेना
एकमेकांशिवाय करमत का नाही
शेवटी उत्तर जरी भेटले प्रश्नाचे
तरी कोणी तयार नव्हतं घ्यायला पुढाकार
मग धाडस करून तिनेच दाखवला
त्याला मनातल्या भावनांचा गुणाकार
गणितात जरी तो
कच्चा असला थोडा
तरी ह्या गणिताने मात्र
त्याला आनंदाने केला होता वेडा...

