अधुरी आस
अधुरी आस
रात्रीच्या एकांतात
चंद्र चांदणीची वाट पाही
त्याला खात्री असे
ती त्यांची भेट टाळणार नाही
आठवून तिच्या आठवणी
स्वप्नात तो तिच्या रमून जाई
स्वप्नांच्या खेळामध्ये वेळेचे
सुद्धा भान हरपून जाई
नियतीच्या खेळापासून
मात्र चंद्र अजाणच राही
इकडे चांदणीला मेघांच्या
गर्दीतून वाटच मिळत नाही
लाख प्रयत्न करूनही
ती चंद्रापर्यंत पोहचत नाही
त्यांच्या मधुर मिलनाची
आस शेवटी अधुरीच राही

