STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Inspirational

ती नसती तर...

ती नसती तर...

1 min
198

ती नसती तर...

कदाचित ही सृष्टीच नसती.

तुम्ही-आम्ही नसतो.

सर्वत्र रानटीपणा माजला असता

कुठेच प्रेम, ममता, वात्सल्य राहील नसत.

सगळीकडे औदासीन्य आलं असतं.

ती आहे म्हणून जन्म आहे

ती आहे म्हणून घराला घरपण आहे.

ती नसते ना घरात तेव्हा

सार काही असून नसल्या सारख असतं

अगदी भकास,निरस...

ती असते तेव्हा चैतन्य असतं

सुख असतं, समाधान असतं

खरंच तिच्या असण्यान इतका फरक पडतो,

तर सांगा ना ती नसती तर किती फरक पडला असता..

म्हणून तिला जपा...

ती भांडते, ओरडते, त्रागा करते....

पण तीच गोंजारते, लाड करते, समजून घेते 

आणि सामावून पण घेते...

तेही अगदी निःस्वार्थीपणे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy