STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Inspirational

माझे बाबा....

माझे बाबा....

1 min
209

 सांग कसं फेडू हे पांग...?

सांग कसं होऊ उत्तराई.

तूचं जन्म दिला मला

एकदा नाही चार बार (आम्ही 4 बहिणीआहोत)

तुचं आयुष्याच सार

आमच्या जगण्याच कोंदण.

आयुष्य कसं जगावं हे तुचं

आम्हा शिकवलं-समजावलं.

साऱ्या आयुष्याची पुंजी

आमच्यावर खर्च केली.

सारं आमच्यावर ओवाळून

तू भरून पावला.

आमच्यासाठी राबून तू 

नेहमी नामा निराळाचं राहिला.

सांग कसं फेडू हे पांग...?

 सांग कसं होऊ उत्तराई,

 जन्मो-जन्मी देवा मला

हाच बाबा हवा... 

मला हाच बाबा हवा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy