kishor zote

Tragedy


4.0  

kishor zote

Tragedy


प्रारब्ध (अभंग)

प्रारब्ध (अभंग)

1 min 140 1 min 140

मुलगी पाहिली I पसंत ती आली ॥

बोलणी ठरली I ती लग्नाची ॥१॥


मंडप सजला | आला तो नवरा ॥

नवरी नखरा I करीतसे ॥२॥


लग्न ते लागले | झाले सुने सुने

केली ती प्रेमाने I पाठवणी ॥३॥


नवतीचे नऊ I सरले दिवस ॥

केला तो नवस | मुलासाठी ॥४॥


घरात विचारी | दया गोड बातमी ॥

घाल असे जन्मी | तू मुलाला ॥५॥


कुठे तरी काही | चूकत ते होते ॥

सदाच वाटते I मनोमनी ॥६॥


उघडले डोळे I ते दवाखान्यात ॥

मुलगी गर्भात I मेली असे॥७॥


प्रारब्ध हे कसे I पोटच्या मुलीचे ॥

स्वागत जन्माचे I गर्भपात ॥८॥


Rate this content
Log in

More marathi poem from kishor zote

Similar marathi poem from Tragedy