STORYMIRROR

Swati Mane

Tragedy

3  

Swati Mane

Tragedy

अभिशाप

अभिशाप

1 min
281

शुभेच्छांच्या भाऊगर्दीत 

आज श्वास घुसमटला आहे 

काही उदास चेहरे 

जणू जाब विचारत आहेत 

चेहरा त्या कळ्यांचा

फुलण्याआधीच खुडल्या गेल्या 

चेहरा त्या निर्भयांचा 

तेवण्याआधीच विझवल्या गेल्या 

चेहरा तो विद्रूपलेला 

तेजाबापेक्षा विखारी 

नजरांनीं दाहलेला

सवाल यांचा एकच आहे 

आमच्यातही लक्ष्मी,सरस्वती 

नी दुर्गेचा वास आहे

आज करताय ज्यांचे सोहळे

त्यांना आमचेच का होते वावडे

आमच्यातही होतीच की 

झाशीवाली नी माता जिजाबाई

मग विटंबना का झाली 

आमच्याच भावनांची

आमच्याही कर्तृत्वाला 

फुलायचे होते

नितळ पाण्यासारखे 

जगायचे होते

लाभले ना भाग्य आम्हा ते

अभिशाप बनला स्त्रीत्व आमचे

मागणे आहे एकच आमचे

नको कौतुक नको सोहळे

वरदान ठरू द्या स्त्रीत्व आमचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy