स्वप्न
स्वप्न


मनाच्या तारांना अलगद छेडावे
कधीतरी स्वप्नांना
वास्तवाचे पंख फुटावे
कधी फुलते कधी कोमेजते
कधी भग्न वेदना
तर कधी आकाशालाही झुकवते
तरीही सतत पाहावेसे वाटते
कारण हे स्वप्नच तर असते
जे रोज नव्याने जगणं शिकवते
आकांक्षाच्या बीजांना
कर्तृत्वाचे खतपाणी मिळावे
नियतीवर मात करुनी
वास्तवाच्या कुशीतुनी अंकुरावे
तुझे काय नि माझे काय
हे एकच तर स्वप्न असते