खेळ जीवनाचा
खेळ जीवनाचा
1 min
441
कळलेच नाही कधी
झाला गुंता भावनांचा
वीण वीण सोडवली
नाहीच सुटला तिढा
हसू येता ओठावरी
भिजल्या तेव्हा पापण्या
क्रोधाच्या उठल्या लहरी
मनी बांध संयमाचा
धैर्याने पावले उभी
उभारी नव्हती मना
शकले झाली मेंदूची
खचला नव्हता कणा
सैरभैर चित्त वृत्ती
ताळमेळ न लागेना
खळबळ अंतरंगी
चेहरा दाद देईना
भावनांच्या याच खेळी
जेती ती स्थितप्रज्ञता
अलगद धागे तोडी
खेळ रंगे जीवनाचा