STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

रंग जीवनाचे

रंग जीवनाचे

1 min
279

कसे उलगडून दावू

सारे रंग जीवनाचे ,

ज्याचे त्याचे जीवन न्यारे

क्षण सुख,दुःखाचे.


सर्वांना हवे सुख

दुःख नको कुणाला,

माणूस म्हणून जगावे

हे सांगणे जगाला.


माझ्या जीवनाचे रंग

जगा उलगडून. दावीन

चित्र जीवनाचे माझ्या

छान रंगवीत राहीन.


दुर्गुणांची करू होळी

भरु जीवनात रंग,

सुख घेऊ वाटून सारे

सारा आनंदी आनंद.


करू भले कर्म नित्य

राष्ट्रोद्धार करु,

रंग जीवनाचे छान

हे जीवन उद्धारु.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy