काळजात असें खोल दरी...
काळजात असें खोल दरी...
काळजात असें खोल दरी...
सांग ना अंतरीचे दुःख
किती दाबू उरी...
झेप घ्यावी उंच गगनी
पण,पायात जकडली
कोणी ही परंपरेची साखळी
सबला मी अबला ठरते
का वेळोवेळी...?
नवनिर्मितीचा अंकुर मी
रुजवले वाढवते रक्त शिंपुनी
जीवाची बाजी लावते
उदरात जोपासूनी,
तरीही मी दुय्यमच ठरते,
ठरत आले ह्या भूलोकी
घरी-दारी....
काळजात असें खोल दरी...
हे भूमाते मज
घे पुन्हा तुझ्या उदरी...
