STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Tragedy Inspirational

स्वप्नांची रांगोळी

स्वप्नांची रांगोळी

1 min
222

माझ्या स्वप्नांची रांगोळी

आज दुर वाटे का  मज

माझ्या मनातील एक गाव

आज पुन्हा येते या ओठी

त्याच आठवांचा मनी ठाव

विदीर्ण जाहल्या होत्या रेषा

नशीबाच्या या ही तळहाती

खुणा शोधती का ओळख

बंद नयनात का बुझु पाहती

खुल्या रानी अबोध गाणी

शब्द अपरिचित रेंगाळली

अजुनी बंद पापणी आड

स्वप्नांची लाट झोका झुली

रंग भरते कल्पना तयात

नभ ऊतरुनी यावे नयनात

माझ्या स्वप्नांची ती रांगोळी

भास भविष्याचे सजवतात

स्वप्न काजव्यांचे या नयनात

त्या स्वप्नास भरले ओंजळीत

येता सत्यात स्वप्नांची रांगोळी

भारावूनी जाई किरणे आसमंतात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance