STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy Others

3  

Supriya Devkar

Tragedy Others

जाणवले आज असे मला

जाणवले आज असे मला

1 min
212

जाणवले आज असे मला 

जे नव्हते माझ्या आवाक्यात 

जवळून पाहिले होते जरी 

मृत्यू नव्हता माझ्या हातात 


वेदनांना सोसण्याचे बळ

उरले नव्हते अंगात

खंगलेल्या देहातून श्वास 

आला होता रंगात 


उरली नव्हती आशा कोणती 

थकले सारे उपचार 

आत्मविश्वास हरला होता 

थाबंले सारे विचार 


मनावरती मिळवून ताबा 

घट्ट केल्या भावना 

असहाय्य जगणं सारून बाजूला 

रोगाचा केला सामना 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy