जीवन एक संघर्ष
जीवन एक संघर्ष
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
काळ्या आईच्या सेवेसाठी
रात्रं-दिन कष्टत राहतो,
जगतास सुखाचे घास देण्या
जगाचा पोशिंदा सदैव राबतो.
जगाचा पोशिंदा सदैव
कष्टातच सुख मानतो,
निष्ठा अन् भक्तीभावाने
काळ्या आईची सेवा करतो..
त्याच्या घामाचा हिशोब
धनधान्यरूपे मिळतो,
त्याची पुण्याई थोर ती
घास सुखाचा मिळतो......
जाण ठेवू त्याच्या काबाडाची
देऊ मिळवूनी उचित सन्मान,
त्याच्या लेकरांच्या मनी सदा
फुलेल सुख आणि समाधान
कष्टाच्या छायेमुळेच
हिरवी माया भरभरून,
रात्रंदिन त्याच्या घामाचे
उगवती सोने होऊन......
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷
