संकट आणि जिद्द
संकट आणि जिद्द
वादळ आलं म्हणून
घाबरायचं नसतं
आलेल्या वादळात
पाय रोवून उभा राहायच असतं
घाबरून संकटाना
हार मानायची नसती
आपली जिद्द अन् कौशल्य
दाखवायची हीच खरी कसोटी असती
सांगा ठणकावून संकटाना
मी आता घाबरणार नाही
तुझ्यावर मात करून
यश मिळवल्याशिवाय राहणार नाही