जिद्द
जिद्द
जिद्द होती माझी म्हणून दाखवलं करून
यश मिळवून हृदय आलं होत भरून
सांगितलं या निर्दयी जगाला जिद्द माझी मोठी
कष्ट करण्यासाठी झोपलो होतो उपाशीपोटी
लाथाळलं होतं या दुनियेने माझी वेळ बघून
वाटलं होतं तेव्हा मला जावं या दुनियेतून निघून
ओळखत नाही दुनिया आपण काही मोठं केल्याशिवाय
समजलं होतं की झुकणार नाही दुनिया राजा झाल्याशिवाय