STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

होळी

होळी

1 min
231

होळी येते, तप्त उन्हाळ्यात आनंद घेऊन 

महाराष्ट्राच्या संस्कृतीची होते आठवण 

नको लाकडे जाळण्याचा आपणास छंद 

वृक्षाच्या जीवावर उठू नका जगू द्या स्वछंदात 


 वाईट विचार जाळून,देऊ जीवदान वृक्षांना 

 सुकलेले गवत चारू या मुक्या प्राण्यांना 

 मुठभर लाकडातच सार्वजनिक करु या होळी 

 आपल्याच हौसेसाठी नको निसर्गाची राखरांगोळी 


जतन करून संस्कृती,परंपरा आपुली टिकवावी 

निसर्गाच्या रक्षणासाठी शपथ खरीखुरी घ्यावी 

होळीच्या दिवशी आठवण व्हावी वृक्ष,प्राणी मित्रांची

उन्हाळ्यात त्यांना जगवा,इच्छा व्हावी पाणी पाजण्याची 


होळी सणाचे मह्त्त्व आपण वाढवू या 

आपल्या विचारात आता नवीन क्रांती घडवू या 

नको तेच,तेच विचार,चांगले करू या आचरण 

नवीन पिढीचा हातभार लागावा,प्रेरणा घ्यावी सत्यातून 


मानवधर्म संदेश देऊ या साऱ्या मानवजातीला 

तहाणलेल्या गावाना पाणी पाजून वाचवू जनतेला 

नको,नासधूस पाण्याची, वाचवू या होळी सणापासून 

रखरखत्या उन्हात पाण्याचे मह्त्त्व घेऊ या समजून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational