STORYMIRROR

Prem Gaikwad

Inspirational

3  

Prem Gaikwad

Inspirational

होळी

होळी

1 min
240

होळी रक्ताची नाही

रंगांची व्हावी,

हिरवा, निळा, पिवळा, भगवा

नको तिरंग्यात पहावी.


उधळण रंगांची काय करता

ती गुणांची व्हावी,

शिकवण मानवता, बंधुता

एकतेची द्यावी.


बोंबलायचं तर बोंबला खुशाल

इथल्या अनिष्टते विरुद्ध

परिवर्तनात इमाने

सर्वांनी साथ द्यावी.


होळी दुर्गुणांची करा

करा अनिष्टतेचे दहन,

इतिहासात नोंद या

वर्तमानाची व्हावी.


होळी करा खुशाल

गुढी लावून यशाची,

दुःख, दैन्य, दारिद्रय, विषमता

त्यात जळून खाक व्हावी..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational