मनपा शाळेत जाऊ
मनपा शाळेत जाऊ
1 min
138
चला जाऊ या मनपाशाळेत
सर्वांगीण विकास करण्यास||धृ||
नको पुस्तके, नको वही
मनपाआम्हां सर्व देई
आनंददायी शिक्षण घेऊ या
शिक्षकांसह आपण नाचू या||१||
दप्तराचे ना आम्हा ओझे
चित्रांनी साऱ्या भिंती सजे
पोषण आहार खाऊ या
तंदुरुस्त आपण होऊ या||२||
शिक्षक कलांचे आगार
जीवना देती आकार
रोज शाळेत येऊ या
उपस्थिती भत्ता मिळवू या||३||
तंत्रज्ञानाची साधने आली
सेमी इंग्रजी शाळा झाली
जगाची भाषा शिकू या
जागतिक कीर्ती मिळवू या||४||
नवोपक्रम नित्य राबवी
ई-लर्निग सदा शिकवी
स्पर्धामध्ये भाग घेऊ या
उज्ज्वल यश मिळवू या|५||
