STORYMIRROR

Vrushali Khadye

Others

4  

Vrushali Khadye

Others

माय मराठी

माय मराठी

1 min
573

महाराष्ट्राची मराठी भाषा महान या जगती

म्हणून शिकू,बोलू आपण गाऊया महती ||धृ||


माय मराठी,अमृतवाणी

सा-या भाषांमधे देखणी

साजशृंगार तिचा पाहूनि, सारे तिज वंदिती||१||


माय मराठी,संतवाणी

ओवी,अभंग, कीर्तन,गाणी

साहित्यिकांच्या लेखनीत,शब्दमाधुर्य गुंजती||२||


माय मराठी,मायबोली

सरळ साधी आहे भोळी

मानवतेशी जोडोनी नाती,निसर्गास पूजिती||३||


माय मराठी,तूच जननी

नतमस्तक मी जाहले चरणी

श्वासाअंती तुझीच जपू,थोर संस्कार संस्कृती||४||


माय मराठी,तुझा थाट

शब्दालंकाराचा घाट

मी मराठी असल्याचा मनी,अभिमान जागती||५||


माय मराठी,पल्लवी आशा 

महाराष्ट्राची राजभाषा

मराठी गौरव दिनी आज,डंका जगी वाजती||६||


Rate this content
Log in