आयुष्याच्या सहवासात
आयुष्याच्या सहवासात
लाभले छान आई-वडील आयुष्याच्या सहवासात,
त्यांच्यामुळे यश मिळते जीवनाच्या प्रवासात..!
कोणतीच नाही काळजी आई-वडील असल्यामुळे,
आयुष्य आहे छान सहवास त्यांचा लाभल्यामुळे..!
माझं ध्येय आहे खूप मोठं शिखर मला गाठायचं आहे,
हरवणार तर नाही ना मी गर्दीत याचीच भीती वाटत आहे..!
आयुष्यात पुढे जाऊन मला काहीतरी व्हायचंय
आई बाबांचे ऋण याच जन्मी फेडायचंय..!
इवलासा जरी जीव माझा स्वप्न आहेत मोठी
धन्य माझी आई ती मी जन्म घेतला तिच्या पोटी..!
आई बाबांच्या सहवासात शिकून घेतेय जीवनाचे सार,
सोबतीला आहेत आई-बाबा, मला त्यांचाच आहे आधार..!
विश्वास आहे माझा स्वतःवर मी नक्कीच शिखर गाठणार
कितीही संकटे आली वाटेत तरी हार कधी ना मानणार..!
आई वडील लाभले चांगले मज यातच सौख्य सामावलं,
आयुष्याच्या सहवासात मी खूप ज्ञान कमावलं..!
