स्वाभिमान
स्वाभिमान
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
कर्तृत्वाने उंच भरारी घेतली
की स्वाभिमानही झेपावतो,
आत्मविश्वासाच्या बळावर
शिखर यशाचे मिळवतो.....
स्वाभिमानाने जगण्याचा
मार्ग सदा निखरतो,
लाचारीच्या क्षणांवर मग
हक्क कुठे उरतो....
स्वतःचा स्वाभिमान सदैव
जपत रहावा जगताना,
स्वाभिमानी संभाजीने
इतिहास रचला मरताना...
शत्रूच्या मनावर राज्य करून
वीर महात्मे स्वाभिमानात जगले,
कर्तृत्वाच्या ताकदीवर
कुणासमोर कधीच नाही वाकले
स्वाभिमानाचा अलंकार
अंत:करणातून परिधान करावा,
अथक परिश्रमानेच जीवनाच्या
मार्गावर सुगंध पेरावा....
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷
