तहानलेली धरणी
तहानलेली धरणी
तहानलेली धरणी आता
माणसाकडे काय मागते,
भरभरून वृक्षराईने मला
पुन्हा एकदा नटव म्हणते....
तहानलेली धरणी आभाळाकडे
काय बरं नजरेतून सांगते,
काळ्याकुट्ट ढगांना कुशीत
पालन-पोषण कर म्हणते....
तहानलेली धरणी ढगांना
काय बरं गूज खोलते,
तुमच्या अमृततुल्य थेंबांनी
मला तृप्त कर म्हणते...
तहानलेली धरणी नदीशी
भरभरून काय बोलते,
तुझा खळखळ मधूर नाद
सदैव कानी पडू दे म्हणते..
तहानलेली धरणी सृष्टीकडे
आशेने का बघत असते,
माझ्या कुशीतल्या जीवांना
सुखात नांदू दे म्हणते....
वृक्षांचा साज अन्
ढगांचा गाज,
तृप्त होऊनी धरणी
येई समृद्धीचा आवाज....
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷
