॥करोनाष्टक॥
॥करोनाष्टक॥
काळजी वाटते प्रत्येकाला
अचानक वाईट विषाणूंचा फैलाव झाला
प्रश्न एकच सगळ्यांसमोर, मज्जाव कसा करावा त्याचा
काळजी काय घ्यायची, चांगल्या मनाने वाचा
धुवा हात प्रथम येता तुम्ही बाहेरुन स्वतःच्या दारात
कडूलिंबाच्या पाल्याने आंघोळ करा न्हाणीघरात
टॉवेल, रुमाल असावा तो प्रत्येकाचा सुका, वेगळा
घामोळ्यांची पावडर लावून घालवा घाम सगळा
घरातच कामं करता करता गप्पागोष्टी करा, बाहेर जाणं टाळा
समजत नाही कसा कुणावर काळाचा पडेल घाला
नका घेऊ फवारलेल्या भाज्या, फळं
कडधान्य खाऊन वाढवा बळ
छोट्या गोष्टी सांभाळल्या तर जीवनाचा आनंद गवसेल पुन्हा
ठार मारू रोगजंतू, समूळ नायनाट करू करोना
अफवांना द्या तिलांजली, सांभाळा आपलं माणुस नातं
चेष्टेची कुस्करी होते, जग सोडून आपलं जातं॥
