गोडवा
गोडवा
गोड नाही बोललात तरी चालेल
दिसल्या क्षणी छान स्माईल द्या
गोडवा असू दे सदैव नात्यांचा
अशी आपली आपुलकी असू द्या....!!
गोड बोलण्या निमित्त कशास हवे
सदैव आपले अंतःकरण शुद्ध हवे
कर्म आपले असावे निर्मळ चांगले
का उगाच शोधत असता पर्व नवे.....!!
अंतःकरणाचा ठाव घ्यावा कधी
धावून जावे इतरांच्या संकटकाळी
घ्याव्या जाणून दुःख वेदना भाव अंतरी
ज्यांचे पुसले असते कुमकुम भाळी.....!!
ऐकावी त्या मातेची करूण कहाणी
जिचा दुर्भाग्याने गेला अचानक पती
त्या भगिनीचा सांगा काय त्यात दोष
संक्रांतीच्या निमित्ताने का हिनवती.....!!
जाचक असल्या रूढी-परंपरा
मित्रांच्या काळजास का छेद करती
दुखवित विधवांचे आयुष्य सारे
त्यांच्यासमोर टाळावी ओटी भरती....!!
