STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Inspirational

4  

Ramkrishna Nagargoje

Inspirational

स्रीशी आदरु असावे असावे

स्रीशी आदरु असावे असावे

1 min
332

स्री लोण्याहून मऊ,

संयम विवेक अधारु,

संसाराचा महारथू,

थोरांचा जन्मदातु,

थोराहुनही थोर,

महिला, मातृत्व भगिनी

स्री बहुजनांचा आधारु


स्री संस्काराचे निर्माण,

स्री महाबळी, नम्रतेचे अागर,

फूल फुले हसरे,

तसे मन मनाशी रमणे,

आनंदाला उधाण,

निसर्ग हसरा, ममतेचा सागर,

स्री रुप हे


कला कौशल्याचे निर्माण,

वीरमाता विरांची जननी,

छाया आणि सावली,

सौजन्य सौंदर्य सुंदरु,

विद्येचा विनयु

ज्ञानअमृत घडू,

स्री एक


स्री पारितोषिकु, सन्मानु,

स्री हस्ते

आदरभाव वर्ततू,

चारित्र्याचा महामेरु,

सदासर्वकाळ वंदनु,

स्रीशी आदरु असावे असावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational