STORYMIRROR

Smita Murali

Inspirational Others

4  

Smita Murali

Inspirational Others

संस्कार

संस्कार

1 min
897

व्यक्तीमत्वास द्यावा

सुयोग्यसा आकार

त्यासाठी आवश्यक

मनावरचे सुसंस्कार


सुसंस्कारातून जन्मे

प्रांतवार एक संस्कृती

संस्कृती नसेल जिथे

फोफावे तिथे विकृती


संस्कृतीचा वारसा

पुर्वजांकडून मिळे

सण-वार-उत्सवांचे

महत्व आज कळे


सुसंस्काराचे मोती

व्यक्तीमत्वाचा साज

संस्कार शिबिरांची

गरज पडते आज


संस्कृतीतून संस्कारांचे

मनामनात बीज रुजावे

संस्कृतीच्या संस्कारांना 

साऱ्या विश्वाने पुजावे!!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational