STORYMIRROR

Jyoti Ahire

Inspirational

4  

Jyoti Ahire

Inspirational

अवयवदान

अवयवदान

1 min
637

सर्व दानात श्रेष्ठ जगात अवयवदान

करूयात अवयवांचा मानसन्मान

हे दान देई अनेकांना जीवदान

करून हे कार्य वाढवू शरीराचा मान


लहान मोठ्यांच्या अडती शस्रक्रिया

करूनी अवयवदान मोक्ष पुण्य मिळवा

देह जळे सरणावरती बने राखरांगोळी

मौल्यवान हे दान मृत्युनंतरही पुण्य मिळवा


चला मित्रांनो करू अवयवदान

यामुळे इंद्रिय नवजीवन जगती

मृत्युनंतरही जगती सन्मानानी

आपल्यानंतरही गरजू लोकं रूपाने जगती


याच हृदय त्याला पुन्हा जीव जगेल

आपल्या मिटल्या डोळ्याने ते सृष्टी पाहील

अवयवदानाची करूयात नव पिढीत जागृती

दान देऊ अवयवाचे मोक्ष अपल्याला मिळेल


घ्या आशीर्वाद सगळ्यांचे जागवा मोहीम

देहदानात येती रक्तदान अवयवदान

परदेहात अवयव नव्याने जगती

सर्वश्रेष्ठ दानामुळे मिळेल मान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational