चांगले विचार
चांगले विचार
चांगले विचार
वेचत गेले पाहिजे
नसले पाहिजे
वैर......!!
अविचारी बसतो
कुढत मनातल्या मनात
सांगत जनात
सुटतो.....!!
आधी विचार
चांगला करून बोलावे
बोलून पडावे
विचारात....!!
विचारांची मांदियाळी
मुक्तपणे उधळण करावी
चांगल्याची धरावी
संगत.......!!
चांगल्या विचारांची
आधी करावी पेरणी
सुधारावी विचारसरणी
स्वतःची.....!!
