घरघर
घरघर
आहे तिथेच
घरात राहायचे
प्रशासनाने काढला
आदेश नागरिकांसाठी
पायपीट लोक
करत राहिले
घर आपले
गाठण्यासाठी लवकर
काही नागरिक
दुर्लक्ष करत
प्रशासनाची टर
उडवण्यात गर्क
साध्या डोळ्यांना
न दिसणारा
विळखा घालतोय
त्या देशद्रोह्यांना
न काही
दोष केला
त्यांनाही होते
सजा विषाणूची
घरघर घरघर
लावलीय या
कोरोना नामक
विषाणूने जगातल्या सर्वांना
काळजी आपली
व आपल्यांची
घरात राहून
घ्या असाच
आदेश सर्वांना
