कोरोनाचा हाहाकार
कोरोनाचा हाहाकार
चैत्र पाडव्याला करु कोरोनाची होळी
चैत्र शुद्ध प्रतिपदा सण मोठा हासरा
आले संकट कोरोनाचे कसा करु मी साजरा
नव्या वर्षाचा आरंभ गुढी उभारु प्रेमाने
आले कोरोनाचे भय लढू त्याशी धैर्याने
नाही मिळणार सर्वत्र गुढी पाडव्याचा साज
शांततेने करु सण देऊ कोरोनाशी लढा आज
चैत्र पाडव्याला करु कोरोनाची होळी
कोरोनाच्या विषाणूची गाडू संपूर्ण मोळी
घरी राहूनच देऊ शुभेच्छा सर्वांना आज
कोरोनाच्या रोगावर शोधू नवे इलाज
गोडधोड खायला मन नाही हो धजत
जीवघेण्या कोरोनाच्या बातम्या नाही संपत
पाडव्याच्या या सणाला नाही पाने-फुले आज
कसा बसलाय कोरोना देशात लेवुनी साज
कोरोनाच्या लढाईला नाही मी डगमगणार
करुन होळी त्याची रोगमुक्त देश बनवणार
चिंता भीती वाटून संकटे नाही टळत
घेई स्वच्छतेची काळजी नका बसू रडत
घेतलाय वसा मोदीजींनी देऊ त्यांना साथ
कोरोनाच्या विषाणूवर मिळवू सारे मात
जागतिक संकट ओढावले देश मोठे प्रस्तावले
पाडव्याच्या मुहुर्ताला भारतीय घाबरले
जमावबंदी पुकारली रोग रोखण्याची संधी
नका घाबरून जाऊ असे जागतिक बंदी
चैत्राच्या शुभदिनी काढली दारी रांगोळी
दाटल्या भावना मना करु कोरोनाची होळी
नको हस्तांदोलन करु लांबून वंदन
सणाच्या या दिवसाला ओळखून राहा जन
घ्यावी आरोग्याची काळजी टाळून गर्दी
जाऊनी घोळक्यात आणू नका कोरोना सर्दी
पाडव्याच्या दिनी मनी केलाय संकल्प
कोरोनाची होळी करु नवा बांधून प्रकल्प
