STORYMIRROR

Mrs Sharayu Kulkarni

Others

3  

Mrs Sharayu Kulkarni

Others

विराजले अधिपती

विराजले अधिपती

1 min
162

भादवाच्या चतुर्थीला

विराजले आधिपती

दारी रांगोळी सुंदर

विघ्नेश्वरा महापती   १)


अति सुंदर मखर

केली जय्यत तयारी

आणु थाटात माटात

प्रसन्नता घरी भारी    २) 


चंदनाचा पाट त्यांना

 ताट चांदीचे जेवाया

फुले जास्वंदी दुर्वाची

चला आरती कराया   ३)


दूर व्हावी महामारी

करु प्रार्थना बाप्पांस

येऊ सारेच एकत्र

 ठेऊ मनी नित्य ध्यास  ४)


विघ्नहर्ता लंबोदरा

तुच सृष्टीचा निर्माता

ठेवशील आनंदात

विनवणी भगवंता   ५)


पूजा पठण भक्तीने

असे छान सोहळा

दहा दिवसात कसा

भक्ता लागलाय लळा   ६)


नाम घेताच प्रसन्न

वाटे मज सुखकर्ता

ताएशील संकटांना

तुच आहे दु:खहर्ता    ७)


Rate this content
Log in