घरं झालं रितं
घरं झालं रितं
1 min
143
आगमनाच्या वेळी
होता उत्साह आनंद
तयारी नियोजन सारे
आता मात्र पाऊले मंद. १)
निरोपाचे क्षण येता
डोळे किती पाणवले
स्तब्ध शांत होऊनिया
हास्य सर्वाचे हरपले २)
वाटतसे जाऊ नये बाप्पा
उत्साह प्रसन्नता छान
घर झालं रितं सकलांचे
कुठेच लागेना ध्यान. ३)
बाप्पांसोबत रमली
सजावट पूजा आरती
आशिर्वादाने राही निरोगी
समाधानी आनंदी संतती ३)
दिले भरभरून दान
सुख समृद्धी अन् धन
येती लवकर करु प्रार्थना
जरी असे निरोपाचे क्षण. ४)
करतील समूळ नष्ट
महामारी रोगराई
सारे होई सुरळीत
नका करु उगाच घाई. ५)
