बाप्पा थोडंसं थांबशील का?
बाप्पा थोडंसं थांबशील का?
सकलांचा दाता तू बाप्पा
बनविलेस सारी सृष्टी
बाप्पा थोडं थांबशील का? ?
जगात चाललेला हाहाकार
सगळी रोगराई महासंकटे
सृष्टीचे चाललेले सर्व नुकसान
सगळे असे पाहतोय आपण
बाप्पा तु काय उपाय योजना करशील
सगणले व्यवस्थापन आहे तुझ्याच हाती
शेतक-याची आत्महत्या नुकसानीचे सत्र
भ्रष्टाचाराची मजल गरीबांचे हाल
करशील या सर्वात गोष्टींची तुच कमाल
तुझ्या हाती सोपवली सूत्रे सारी आम्ही
तुच कर्ता करविता विघ्नहर्ता सकलांचा
बुद्धी देवता देशील ज्ञान घडेल छान
सुखकर जीवन तुझ्या शक्तीची कमाल
करून बाप्पा दाखवशील का? ?
करतोय गुणगान तुझी आराधना आम्ही
भाव उत्कंठा आल्या दाटुनी भावना
सारे तु पाहण्या थांबशील का बाप्पा? ?
कोड्यात नाही टाकत बाप्पा तुम्हांला
आशीर्वाद आणि कृपाछत्र राहू दे भक्तांस
आली निरोपाची वेळ म्हणून म्हणते रे
थांबशील का बाप्पा जरा
नीटनेटके करशील का??
