STORYMIRROR

manisha samnerkar

Inspirational

4  

manisha samnerkar

Inspirational

सावर रे मना

सावर रे मना

1 min
460

सावर रे मना सावर

चढ उतारांचे आहे घाट

मार्गक्रमण करीत राहा

अडचणीतून काढ वाट


अपयश येईल तुज

निराश नको होऊ तू

आव्हानांचा सामना कर

दुःखी नको होऊ तू


संकटे येती अचानक

पर्वतासारखी राहती उभी

दृढ निश्चय कर तू

उंच झेप घे नभी


स्वार्थी मोहमायी रंगीन

दुनियेत नकोस फसू

टिंगलटवाळी करुन

करतील तुझं हसू


खंबीरपणे उभा राहून

अथक कर परिश्रम

नाही कधीच जाणार

वाया तुझे श्रम


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational