STORYMIRROR

manisha samnerkar

Others

4  

manisha samnerkar

Others

स्त्रीशक्ती

स्त्रीशक्ती

1 min
472

अनादी काळापासून

नारी ऐकतो तुझ्या कथा

कौतुकास्पद असतात

नेहमीच शौर्याच्या गाथा


चंदनापरी संसारात

नेहमीच झिजवते काया

कुटुंबाची वणवण होवू नये

पदराखाली देते माया


माता, बहिण, पत्नी, मुलगी

विविध भूमिकेत कमाल

यशोशिखरेही पादाक्रांत केलीस

स्त्रीशक्ती तुझ्या कर्तृत्वाला सलाम


दृष्टप्रवृत्तीचा संहार व्हावा

म्हणून होते महिषासुरमर्दिनी

रणांगणात मर्दानी पराक्रम

दाखवून झालीस तू रणरागिणी


तुझ्याविणा अपुरा हा

मानवी जन्म नारी

समस्त मानव जातीला

त्याग, कष्टाने नेहमी तारी


समाजात वावरताना

असू द्या आदराचे स्थान

प्रत्येकाच्या नजरेने द्यावा

तिला मान-सन्मान


Rate this content
Log in