ऊब मायेची
ऊब मायेची
1 min
490
अशिक्षित अडाणी
मजूर माय तुझी
जोजावते बाळा झोळी
फाटक्या पदराची माझी //१//
हातावरती बाळा
आपल पोट
कष्ट करुन राबेल
तेव्हा मिळेल नोट//२//
बाप तुझा दारुड्या
संसार नाही कळाला
वणवाश्या सारखा फिरुन
उभा संसार जाळला//३//
नको रडू बाळा
वेदना होता मनास
या मोहमयी दुनियेत
कोणाची कदर न कोणास//४//
झुल्यातून बघ आकाशी
चांदोमामा व हरणाची गाडी
फाटक्या नशिबाला आपल्या
बाळा चांदोमामाची ओढी//५//
दरिद्री मायेची बाळा
समजून घे ही व्यथा
उब मायेची देतांना गाते
अंगाई गीतात स्वः कथा//६/